अकोला पश्चिम चे आमदार साजिद खान पठाण यांना धमकी; वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी...


अकोला पश्चिम चे आमदार साजिद खान पठाण यांना धमकी; वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी...

जळगाव जामोद प्रतिनिधी:

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व पोलिस स्कॉर्टिंग वाहन देण्याची मागणी जळगाव जामोद कांग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.माहितीनुसार, दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एका कॉलिंग अॅपद्वारे आलेल्या फोनवरून स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर असल्याचे सांगत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आणि पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. प्राथमिक तपासात कॉल परदेशातून आल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आमदार पठाण यांच्या जीवितास धोका संभवत असल्याने त्यांना तात्काळ ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आणि एक विशेष पोलिस स्कॉर्टिंग वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधीला धमकी देणे ही गंभीर बाब असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी पक्षनेते स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, अविनाश उमरकर,  ज्योतीताई ढोकणे, एड भाऊसाहेब भालेराव, एड.अमर पाचपोर, बाबु भाई जमादार, डॉ शाकीर, अजहर देशमुख, भाळसाळे सर, एड संदिप मानकर, राजिव घुटे, एड इंगळे, हुसेन राही, निलेश तायडे,जुबेरोद्दीन पटेल,तुकाराम मुरलीधर गायगोळ, महेंद्र बोडखे,विनोद धंदर, शंकर म्हस्के, दिनेश काटकर,गंभीर घट्टे, रामेश्वर पाटील, व कांग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post