जळगाव जामोद प्रतिनिधी...
जिल्ह्यासह राज्यभरात हवामान बदल, बाजारातील चढउतार आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी असणाऱ्या मर्यादामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती मिळावी म्हणून कृषी विभागाने महाविस्तार एआय ॲप विकसित केले आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एक डीजिटल सहायक ॲप शेती आणि आधुनिक डीजिटल सहायक ॲप आहे. पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यामधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने हे विकसीत करण्यात आले आहे. या ॲपमधील चॅट बॉट वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत प्रश्न विचारता येणार आहेत. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला तसेच विविध माहिती मिळणार आहेत. आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन एका क्लिकवर उपलब्ध करून देते.सदरील महाविस्तार ॲप जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मौजे सुनगाव येथे जळगाव जामोद कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांकरिता कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जवळपास 200 शेतकऱ्यांना ॲप डाऊनलोड करून देण्यात आले. कॅम्प यशस्वी करण्याकरिता करिता कृषी अधिकारी भटकर, आत्मा व्यवस्थापक राऊत, सहायक कृषी अधिकारी गव्हाणे, शेकोकार, गाडगे, शेळके, ऑपरेटर निवाणे , गावचे कृषीमित्र मोहन सिंह राजपूत यांनी परिश्रम घेतले.
