सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथे रामापूर रोडवरील मानव इरिगेशन कंपनी येथे संत्रा पिकावरील किड व रोग नियंत्रण या बाबत चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.पिकाच्या मुळापासून तर काढणीपर्यंत येणाऱ्या समस्या या विषयावर सिंजेंटा कंपनीचे टीएमडी मॅनेजर पवन देशमुख यांनी शेतकऱ्यासोबत हितगुज केले.व नंतर नर्सरी पासून तर पीक काढणीपर्यंतचे मार्गदर्शन पवन देशमुख यांनी चर्चासत्रामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.संत्रा पिकावर येणाऱ्या समस्यावर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊन समाधान केले.तसेच संत्रा पिकावरील कीड व रोग यांच्या समस्या वर सिंजेंटा कंपनीने अतिउच्च तंत्रज्ञानाने विकसित केलेले दोन नवीन उत्पादन सिमोर्डीस व मीरावीस डिओ यांच्या कार्यपद्धतीबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.संत्रा पिकावर येणाऱ्या समस्यावर विचारलेल्या प्रश्नां बाबत शेतकऱ्यांचे समाधान केले.तसेच संत्रा पिकावरील कीड व रोग यांच्या समस्यावर सिंजेंटा कंपनीने अतिउच्च तंत्रज्ञानाने विकसित केलेले दोन नवीन उत्पादन सिमोर्डीस व मीरावीस डिओ यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली.चर्चासत्रामध्ये आवर्जून उपस्थित असलेले प्रगतशील शेतकरी तथा अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक उद्यान पंडित प्रभाकर मानकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच परिसरातील शेतकऱ्यांकरता चर्चासत्र घडवून आणणारे मानव इरिगेशन कंपनीचे संचालक तुळशीराम इस्थापे यांचा कंपनीतर्फे सत्कार करण्यात आला.चर्चासत्रामध्ये बोर्डी,शिवपुर,रामापुर,अकोलखेड,या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
