सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
७ फेब्रुवारी रोजी श्रावस्ती बुद्ध विहार, सिद्धार्थ नगर अकोट येथे माता रमाबाई आंबेडकर यांची १२८ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम माता रमाबाई आंबेडकर यांचे प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्ष मय जीवन प्रवासात खंबीरपणे शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी वनदगाव येथे झाला. बालपणीच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या रमाबाईचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी डॉ भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला . डॉ बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन करत संसाराचा गाडा मोठ्या मेहनतीने गोवऱ्या थापून चालविला. अशा महान माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी व चिमुकल्या लहान मुला मुलींचे संस्कृतिक कार्यक्रम विशाखा महिला मंडळ, व क्रांती भीमसेना नवयुवक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. व कार्यक्रमाचा शेवट मुलांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आला.
