सुनगाव येथील महादेव मळी संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा...



 सुनगाव येथील महादेव मळी संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा... 

जळगाव जामोद प्रतिनिधी_

सुनगाव येथील श्री महादेव मढी संस्थान येथे आदिशक्ती महिला भजनी मंडळ व श्री संत गजानन महाराज सांप्रदायिक भजन मंडळ यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे,या कथेची दिनांक 8 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली तर दिनांक 16 फेब्रुवारी रोजी या कथेची सांगता होणार आहे. या कथेचे कथाकार ह भ प आश्विन महाराज कवरे यांच्या यांच्या वाणीतून होणार आहे. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन दिंडी सोहळा संपन्न झाला, तर 9 फेब्रुवारी रोजी हभप एकनाथ महाराज पाचमासे यांचे कीर्तन तर 10 फेब्रुवारी रोजी हभप कुमारी आचलताई महाराज पाटील यांचे कीर्तन ,11 फेब्रुवारी रोजी ह भ प गायत्रीताई महाराज पांडव यांचे कीर्तन ,12 फेब्रुवारी रोजी हभप कुमारी नेहा ताई महाराज ताडे यांचे कीर्तन ,13 फेब्रुवारी रोजी हभप कुमारी श्रद्धा ताई महाराज बोराकडे यांचे कीर्तन ,14 फेब्रुवारी रोजी ह भ प कैलास महाराज धर्माळी यांचे कीर्तन, तर 15 फेब्रुवारी रोजी ह भ प अमोल महाराज रिगावकर यांचे कीर्तन होणार आहे. दैनंदिन कार्यक्रम मध्ये सकाळी पाच ते सहा काकडा आरती दुपारी एक ते पाच शिव महापुराण तर सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा श्रीहरी कीर्तन असे आयोजन करण्यात आले आहे तरी शिवमहापुराणाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post