कृषीमित्र प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते परिवार यांच्या वतीने स्नेहसंमेलन व रक्तदान शिबिर संपन्न..


 कृषीमित्र प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते परिवार यांच्या वतीने स्नेहसंमेलन व रक्तदान शिबिर संपन्न..

जळगांव जामोद(प्रतिनिधी):

संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील कृषी प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी स्नेहसंमेलन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी माळी समाज मंगल कार्यालय संग्रामपूर येथे  उत्साहात पार पडले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले. कृषी मित्र प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते परिवार यांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सागर भैया, तर उद्घाटक शिवशंकर घिवे,हे होते. तसेच संग्रामपूर व जळगाव (जा) तालुक्यातील सर्व कृषी विक्रेता बंधू कृषीमित्र प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी लकी ड्रॉ मार्फत ११ कंपनी प्रतिनिधींना हेल्मेटचे वाटप करण्यात आले .रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे ही बाब लक्षात घेऊन कृषीमित्र परिवाराच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर डॉ हेडगेवार रक्त केंद्र अकोला यांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने यासाठी सहकार्य केले,कृषी मित्र व कृषी निविष्ठा परिवाराच्या वतीने सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कृषी मित्र परिवार च्या वतीने प्रस्तावना सोपान घुले यांनी व संचालन उमेश बावणे साहेब यांनी केले,संपूर्ण स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर उभे सोपान घुले,उमेश बावणे,दीपक बोर्डे, अनिल रोटे परमेश्वर सरदार ज्ञानेश्वर ताठर  श्याम धोरण, कार्तिक गोतमारे, आदित्य पाटील, संतोष भिवटे, सचिन ताठे, रोशन क्षीरसागर ,अमोल सोयस्कर, संजय शेळके, दत्ता चोपडे, उज्वल पान्हेरकर , वसुलकर साहेब,भास्कर फुंडकर, योगेश गायकी,अक्षय गोतमारे, सागर डाबरे भावेश इंगळे, गौरव कावरे, मोहन मानकर यांच्याच्यासह सर्व कृषीमित्र परिवारने अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post