जळगाव जामोद (प्रतिनिधी):
स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दिनांक 9 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गृह अर्थशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासोबतच भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी पारंपारिक वेशभूषा दिवसही साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माईसर होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहा ताई टापरे विदर्भ महिला वेल्फेअर सोसायटीच्या सचिव तसेच आदिवासी आश्रम शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. यासोबतच ज्यांचा गौरव करण्यात आल्या अशा महिला गृह उद्योजिका सविताताई देशमुख आणि माजी विद्यार्थिनी एसटी महामंडळाच्या महिला वाहक माधुरी करांगळे या उपस्थित होत्या याबरोबरच सांस्कृतिक विभाग समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी ,गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका अर्चना जोशी ,प्राध्यापिका सौ नीलिमा भोपळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलानाने झाली व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा आणि महिला दिन यावर आपले मनोगत मांडले गृह उद्योजिका सविताताई देशमुख यांनी आपल्या उद्योगाला कशी सुरुवात केली आणि तो आज ब्रँड म्हणून बाजारपेठेत कसा आला याविषयी आपले अनुभव कथन केले सोबतच कुठलेही भांडवल नसताना अंगी असलेल्या पाककलेची आवड आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन हा उद्योग सुरू केल्याचे सांगितले तसेच कोणावर वेळ सांगून घेत नाही तेव्हा आपल्याजवळ असलेल्या कलागुणांना वाव द्या व संधीचे सोने करा असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. यासोबतच दुसऱ्या कर्तृत्ववान महिला एसटी महामंडळाच्या वाहक माधुरीताई करांगळे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून कुठलेही काम नाही किंवा कमीपणाचे नाही आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे तेव्हा तुम्ही पण स्वतःच्या पायावर उभे रहा व कुटुंबात अर्थार्जनासाठी हातभार लावा तसेच सक्षम व्हा असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व मार्गदर्शिका यांनी पारंपारिक वेशभूषा यावर मुलींचे कौतुक केले व आपल्या मार्गदर्शनातून भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले तसेच आर्थिक प्रगती होणे गरजेचे आहे त्यासाठी मुलींनी आपला दृष्टिकोन बदलवावा तसेच आर्थिक साक्षरते सोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे सांगितले प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा परंपरेचा अभिमान असावा व त्या दृष्टीने आपला पेहेराव असावा असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांचा सन्मान आणि आदर यावर विशेष भर दिला आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत महिलांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे तसेच पारंपारिक वेशभूषा लोप पावत आहे तेव्हा त्यांचे जतन करणे व आपली संस्कृती रुजवणे हा होता याबरोबरच मुलींना गृह उद्योग संधी व मार्गदर्शन करणे हा होता. प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहरावात आले मुलींनी साडी व मुलांनी मंगलवेस कुर्ता पायजमा व फेटे या महाराष्ट्रातील संस्कृती दर्शवणारी वेशभूषा यामुळे महाविद्यालयीन परिसर मंगलमय आनंदी व उत्साही होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सिद्धार्थ इंगळे सर तर प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका अर्चना जोशी यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परीक्षा घेतले.
