लोणार तालुक्यातील हिरडव येथे 'महाराजस्व समाधान शिबिराचं केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले उद्घाटन...


 लोणार  तालुक्यातील हिरडव येथे 'महाराजस्व समाधान शिबिराचं केंद्रीयमंत्री  प्रतापराव जाधव यांनी केले उद्घाटन... 

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):

 शासनाच्या विविध योजनेचा लाभ सहजपणे ,शेवटच्या घटकापर्यंत  पोहचविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  अभियान राबविण्यात येत आहे .या अभियानाचा लाभ ग्रामीण जनतेने घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या लोणार तालुक्यातील हिरडव येथे आज 14 मार्च रोजी  'महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते . या अभियानाचे उद्घाटन केद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते  यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय रायमुलकर तहसीलदार भूषण पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ मापारी उपस्थित होते.

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज जे अर्ज स्वीकारले आहे   त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी साहेबी थाट बाजुला सारून जनतेचे काम करावे .. तुम्ही आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेच्या हिताचे कामे वेळेचे आत पूर्ण करून देण्याचे निर्देशित त्यांनी यावेळी दिले ...या शिबिरात महसूल विभागासह इतर १५ हून अधिक विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.यामध्ये महसूल सेवा: डिजिटल ७/१२, ८अ वाटप आणि फेरफार प्रकरणांचा निपटारा.. शासकीय दाखले: उत्पन्न, जात आणि रहिवासी दाखल्यांचे त्वरित वितरण.आरोग्य आणि कल्याण: 'आभा' (ABHA) कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डांचे प्रत्यक्ष वाटप. शेतकरी योजना: पीएम किसान ई-केवायसी (E-KYC) आणि युनिक फार्मर आयडी निर्मिती.आदींचा समावेश आहे यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते  लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि लाभ वाटप करण्यात आहे ...

Previous Post Next Post