गॅस दरवाढीचा भडका...मोदी सरकार विरोधात काँग्रेसचा एल्गार...


 गॅस  दरवाढीचा भडका...मोदी सरकार विरोधात काँग्रेसचा एल्गार...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

गुरुवार,दि.१२ मार्च २०२६ रोजी महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील मोदी सरकारने LPG गॅसच्या किंमती वाढवून पठाणी लुट करत आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढवल्या तर त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही, सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत तशी व्यवस्था राबवावी अशा आशयाचे निवेदन प्रदेशाध्यक्ष मा.हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे नेतृत्वात तसेच वंचित बहूजन आघाडी जळगाव जामोद यांच्या पाठिंब्याने  शासनाला तहसिलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत दिले. शिक्षण, नोकरी, व्यवसाय , व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते, व्यावसायीक गॅसच्या किंमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने  खाद्यपदार्थाचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.युपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर ४०० रुपयांना मिळत होते, आता एका गॅस सिलेंडरसाठी ९०० रुपयेपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. सिलेंडर बुक करण्याचा कालावधी हा  १५ दिवसावरुन एक महिन्याचा करण्यात आला आहे, यामुळे मोठ्या  संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी यांनी निदर्शने केली.

         व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीही १९०० रूपयावर गेल्या आहेत तसेच या सिलेंडरचे रेशनिंग करण्यात येत आहे याचा मोठा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार, व्यापारासाठी मोठ्या संख्येने घराच्या बाहेरचे जेवण्याची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. गॅसची टंचाई नाही असे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळी, खादय पदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायीक या सर्वांना गॅस सिलिंडर विना अडथळा सहजपणे उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी व सरकारने वाढवलेल्या किंमती तात्काळ कमी कराव्यात .तसेच महिलांना अर्ध्या तिकिटाची सुविधा शासनाने घोषित केली आहे. मग कोणत्याही वयातील महिला असो त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या बस मधे अर्धे तिकीट लागते. मग आधार कार्ड असतांना त्यासाठी वेगळ्या ओळखपत्राची आवश्यकता काय.? ते स्मार्टकार्ड काढण्यासाठी उगाच 199 रुपयाचा महिलांना भुर्दंड का? प्रति महिला 199 रुपये जमा करून कोट्यावधी रुपये कोण्या एजन्सीच्या घशात घालायचे आहेत . 

ही स्मार्ट कार्ड योजना रद्द करून सरसकट पूर्वीप्रमाणेच महिलांना आधार कार्डच्या आधारे अर्धे तिकिटाची सुविधा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

 यावेळी कांग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष अॕड.भालेराव वंचित बहूजन आघाडी तालुकाध्यक्ष देवा भाऊ दामोदर , काँग्रेस पक्ष नेते स्वाति ताई वाकेकर ,माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील,ज्योती ताई ढोकणे , अविनाश भाऊ ऊमरकर ,मिनाताई सातव ,शारदाताई कुवारे माजी सभापती जिल्हा परिषद बुलढाणा, न प गटनेता संगीता विलास भारसाकळे ,डाॕक्टर समीना शाकीर खान ,फरजानाबी सैय्यद अफरोज ,वैशाली निलेश तायडे न .प. सदस्य ,प्रमोद पाटील,अॕड.संदिप उगले , उपसभापती प्रशांत अवसरमोल ,बाबुभाई जामदार,अर्जून घोलप ,अॕड.संदिप मानकर ,राजू घुटे, डॉक्टर शाकीर, अफरोज भाई, समूभाऊ जागीरदार, अझहर  देशमुख, रतनभाऊ नाईक, विजयतायडे ,निलेशतायडे ,भारसाकळे सर , प्रमोद कोकाटे, श्रीराम भिडे , प्रकाश जवंजाळ , विजय पुंडलिक तायडे ,सुरेश भाऊ वानखडे,बाहोद्दिनभाऊ ठेकेदार ,तौफीकभाई ,अय्याजभाई ,जुनेद भाई, राजीक भाई, दिनेश काटकर , तुकाराम गटमणे , तुषार पाटील, विठ्ठल पांडे, सचीन जाधव , अजय ताठे , सुनील कळस्कार ,अजय राजपूत ,संजय राखोंडे  ,हुसेन राही ,ऊखर्डा सोळंके ,कलीम तडवी,दिपक राजपूत,वैभवसारोकार ,शिवाजी पाटिल , राधेश्याम खरात हजर होते.

Previous Post Next Post