'अर्थसंकल्प समजून घेताना' विषयावर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात व्याख्यान संपन्न...
जळगाव जामोद (प्रतिनिधी):
स्थानिक श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने 'अर्थसंकल्प समजून घेताना' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या आर्थिक धोरणांची आणि अर्थसंकल्पाची सर्वसामान्यांना सोप्या भाषेत ओळख व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश विप्रदास यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून अर्थसंकल्पाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी अशा व्याख्यानांची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर आर. आर. गव्हाळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख जी एस कॉलेज खामगाव आणि प्राध्यापक डॉक्टर दिलीप महाजन, अर्थशास्त्र विवाह प्रमुख एसपीएम कॉलेज चिखली हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील विविध तांत्रिक बाबी, कररचना आणि त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षर असणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला.
व्यासपीठावर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश विप्रदास यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद बावस्कर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विनय उमरकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विनोद बावस्कर, प्रा. सचिन उनडकार, प्रा. विनय उमरकर, प्रा. विठोबा देठे, प्रा. नीलिमा भोपळे, प्रा. आकाश निलजे, गजानन वानखेडे, हर्षद धर्मे व योगेश तायडे यांनी अथक परिश्रम घेतले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
