जळगाव जामोद(प्रतिनिधी):
व्हाट्सअप द्वारे झालेल्या मैत्रीचा फायदा घेऊन तरुणीला लॉजवर बोलाविले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली यासंदर्भात फिर्यादी तरुणीने 20 मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी मयूर शालिग्राम खीरोडकार वय 23 वर्ष हा सदर तरुणीचा वाईट उद्देशाने पाठलाग करीत असे.तसेच व्हाट्सअप वर मेसेज करीत असे.तरुणीने बोलायचे नाही म्हटले तर स्वतःचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी देत असे. तू मला भेटायला आली नाही तर मी मरून जाईल असा मेसेज केला.फिर्यादी आरोपीचे त्रासाला कंटाळली होती आई-वडिलांना ट्युशनला जात असल्याचे सांगून घरातून निघताना बॅगमध्ये कीटक नाशकाची डबी सोबत घेतली.आरोपीने फिर्यादीला शेगाव येथील गेस्ट हाऊस मध्ये नेले जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने नकार दिल्याने तुला जगू देणार नाही तुझे लग्न होऊ देणार नाही तुझा भावाला टिप्परने उडवून देईल अशा धमक्या दिल्या तर तू आत्ताच माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी माझ्या हाताची नस कापून तुला खोट्या गुन्हा फसवून टाकीन असे धमकी सुद्धा दिली. त्यानंतर आरोपी गेस्ट हाउस चे खाली गेला असता फिर्यादीने कीटकनाशक प्राशन केले. तेव्हा आरोपी हा रूम मध्ये आल्यानंतर त्याने शेगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती केले त्यानंतर पुढील उपचार साठी अकोला येथे घेऊन गेला व त्या ठिकाणी सुद्धा त्याचे विरुद्ध पोलिसात तक्रार करायची नाही अन्यथा तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिली होती. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर 20 मार्च रोजी सदर तरुणीने आरोग्यविरुद्ध तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी कलम 74, 75, 78, 351(3) बी. एन. एस अन्वये गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी ठाणेदार नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे या तपास करीत आहेत
