जळगाव जामोद (प्रतिनिधी)
भेंडवळ येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व नियमित शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब शिक्षणाच्या मूलभूत हक्कांचा उघड भंग असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट अन्याय करणारी आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन व भेंडवळ ग्रामस्थांच्या वतीने मा.गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांना जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, यामध्ये असे नमुद आहे कि शाळेमध्ये तात्काळ व पुरेशा संख्येने शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा, येत्या 10 दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास, लोकशाही मार्गाने *तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला, या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकिल शाह, सम्यक विद्यार्थी आंदोलन ता.महासचिव सरफराज शाह, ता.संघटक भुषण भारसाकळे, युसुफ शाह, चांद शहा , सलिम शहा, शोरब शहा, शकिल शहा, सोहेल खान, वंचितचे देवानंद दामोदर, सुनिल बोदडे, विजय सातव, उत्तम वानखडे, गुलाबराव आठवले, समाधान इंगळे, विजय दामोदर, किशोर दामोदर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
