जळगांव जामोद(प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आज दिनांक ६एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी जळगांव जामोद च्या वतीने निदर्शने देउन सरकारचा निषेध व्यक्त करुन मा तहसिलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले,या निवेदनात गॅस सिलेंडर ची कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडर चा काळाबाजार थांबवुन काळाबाजार करणाऱ्यावर सक्त कारवाई करण्यात यावी, गॅस बुकिंग २५ दिवसाची अट शिथिल करण्यात यावी, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावे, सरकारने सांगावे कि परिस्थिती कधी सर्व सामान्य होईल ,ज्यांची के वाय सि झालेली नसेल त्यांना गॅस सिलेंडर देण्यात यावे,अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत *नरेंदर कब मिलेगा सिलेंडर* व *मुद्रा मोदी मुजरा मोदी* अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, तालुका महासचिव सुनिल बोदडे, उपसभापती प्रशांत अवसरमोल, बौद्ध महासभेचे अध्यक्ष जगदिश हातेकर,प्रा,विजय सातव,आजम कुरेशी,पार्वताबाई इंगळे, सुनिता हेलोडे,करुणा खंडेराव, बाबुराव तायडे,अरुण पारवे, विजयकुमार तायडे, रविंद्र नाईक,श्रिक्रुष्ण गवई, अँड संदिप उगले,रवि जाधव, साहेबराव जाधव, संपादक उत्तमराव वानखडे, संतोष तिजारे, मंगल डोंगरदिवे, प्रमोद कोकाटे, अताउल्ला खान, नाना डोंगरदिवे,दयाराम सोनोने,ज्ञानेश्वर कोकाटे, गुलाबराव आठवले, रामभाऊ तायडे,अक्षय वाकोडे,हरिदास वाघमारे, सुनिल तायडे, विजय तायडे,नारायण पवार, सोहेल खान, संतोष भारसाकळे, अमोल तायडे,शेकोजी दाभाडे सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
