जळगाव जामोद(प्रतिनिधी):
मौजे वायाळ ता जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व 100 खाटांचे संलग्नीत रुग्णालय सन 2024 मधे मंजुर करण्यात आले होते त्यानंतर सदर रुग्णालय बांधकाम करणे, यंत्र सामुग्री खरेदी व पदनिर्मिती इत्यादी कामे करण्यासाठी मंत्री मंडळाने मान्यता दिल्यानंतर मौजे वायाळ ता जळगाव जामोद येथील रुग्णालय व महाविद्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी नियमित पदे निर्माण करणे व बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरणे अशी एकूण 210 पदे ह्या विद्यालय व रुग्णालय करिता भरणे साठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाद्वारे शासन निर्णय क्रमांक आयुसे -0125/प्र.क्र. 06/25/918634/आयु-1 नुसार मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालया करिता 68 नियमित पदे निर्माण करण्यास व 51 मनुष्यबळ सेवा प्रचलित नियमानुसार बाह्य यंत्रणे द्वारे उपलब्ध करण्यास तसेच संलग्नीत रुग्णालया करिता 41 नियमित पदे निर्माण करण्यास व 50 मनुष्यबळ सेवा प्रचलित नियमानुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास उपरोक्त शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये गट अ, ब, क(नियमित) श्रेणितील एकूण 68 नियमित पदे भरली जाणार आहेत तर गट - क ( बाह्ययंत्रणे द्वारे )आणि गट ड श्रेणितील एकूण 51 पदे महाविद्यालया एकूण तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. तसेच आयुर्वेद रुग्णालया करिता गट - अ,ब आणि क राजपत्रित अशी नियमित एकूण 41 पदे भरली जाणार आहेत त्या बरोबर डॉक्टर, गट - क आणि ड या श्रेणितील एकूण 50 पदे ही बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत.
_____________________________
जळगाव जामोद तालुक्यातील वायाळ येथे मंजुर असलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आज आपण एक मैलाचा दगड पार केला आहे. येत्यावर्षा पासन याठिकाणी विद्यार्थी प्रवेश होऊन आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संलग्नीत रुग्णालय सुरु करण्याचा मानस आहे.
_आमदार डॉक्टर संजय कुटे...
_____________________________
