राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीदिनी ओल्ड एज होम ला सुरुवात....


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीदिनी ओल्ड एज होम ला सुरुवात....

सय्यद शकिल/अकोट (प्रतिनिधी):

30 एप्रिल 2026 रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त  छत्रपती शिवबा बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था अकोट द्वारा शहरातील निराधार लोकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून ओल्ड एज होम ची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत निराधार, वृद्ध लोकांना दररोज सकाळी व सायंकाळी दोन वेळच्या  भोजनाची व्यवस्था करून देण्यात येईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष यांनी दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज ह्या थोर पुरुषांनी नेहमीच आपल्या कीर्तनातून समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम केले. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या कीर्तनातून नेहमी म्हणायचे की  भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, निराधारास आधार द्यावा. आणि याच तत्त्वानुसार छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने ओल्डेच होमला सुरुवात करण्यात आली आहे. अकोट येथे अंजनगाव रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर साबळे कॉम्प्लेक्स येथे ह्या सामाजिक उपक्रमाची काल सुरुवात करण्यात आली तरी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील निराधार लोकांना या उपक्रमाची माहिती द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे.

Previous Post Next Post