गो सन्मान आव्हान अभियान : जळगाव (जामोद) येथे गोपूजन करून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी निवेदन...


 गो सन्मान आव्हान अभियान : जळगाव (जामोद) येथे गोपूजन करून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी निवेदन...

जळगाव (जामोद) प्रतिनिधी:

गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जळगाव (जामोद) येथे गोपूजन करून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल, माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेत गोपूजन करून करण्यात आली. गोमातेची विधिवत पूजा करून तिचे आशीर्वाद घेतल्यानंतर भजनी मंडळींच्या उपस्थितीत गोशाळेतून उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.गोमाता ही भारतीय संस्कृती, धर्म आणि कृषी परंपरेचा पाया आहे. तिला राष्ट्रमातेचा कायदेशीर दर्जा मिळाल्यास गोरक्षणाला चालना मिळेल, गोआधारित शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.निवेदन देताना गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी मोदी, कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल, कृष्णाई गोशाळेचे सचिव सचिनजी हागे,अश्विनमहाराज कवरे नवलकुमार भैय्या,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजयजी वानखडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजयजी वंडाळे, प्रशांत खोकले, सुनील ढगे, विजय कुलकर्णी सर, ह.भ.प. सुनंदाताई चौधरी, सुनिताताई म्हसाळ तसेच असंख्य भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे योग्य त्या पद्धतीने पाठवण्याचे आश्वासन दिले. गो सन्मान आव्हान अभियानाच्या माध्यमातून देशभरात गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

Previous Post Next Post