जामोद सहकारी संस्थेचे बुलढाणा जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण सिताराम दलाल यांची नियुक्ती...


 जामोद सहकारी संस्थेचे बुलढाणा जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण सिताराम दलाल यांची नियुक्ती...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

जामोद सहकारी संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्हा बँकेच्या  प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण सिताराम दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. लक्ष्मण दलाल हे गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टी चे सक्रिय कार्यकर्ता आहे त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा विचार करून त्यांना जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.नियुक्तीनंतर लक्ष्मण दलाल यांनी सांगितले की, "जामोद परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सभासदांच्या अडचणी जिल्हा बँकेपर्यंत पोहोचवून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. सहकारी चळवळीला बळकट करणे हे माझे प्राधान्य असेल."त्यांच्या नियुक्तीबद्दल जामोद परिसरातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विविध सामाजिक आणि सहकारी संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post Next Post