महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे...


 महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे...

संग्रामपुर[प्रतिनिधी] 

बारी समाज विकासासाठी तसेच समाजाच्या  हितासाठी लोकचळवळ म्हणून या उद्देशाने  स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र बारी ब्रिगेड ही बारी समाज बांधव यांचे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदि तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी युवा उद्योजक सामाजीक कार्यकर्ते वैभव डाबरे यांची बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड दि.४ एप्रिल रोजी वरवट बकाल येथील संघटनेच्या कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे यांची नियुक्ती झाल्या बद्दल बारी ब्रिगेड संघटनेच्या  वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हादराव दातार व राज्य सल्लागार डॉ अशोक भुते यांच्या हस्ते नियुक्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  त्यांचे समाज बांधवा सह सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

Previous Post Next Post