छोटा कब्रस्तानच्या समस्यांकडे नगरपरिषद नियोजन सभापती सय्यद नफीज यांनी वेधले लक्ष; पाणी आणि संरक्षण भिंतीसाठी प्रशासनाला साकडे...


 छोटा कब्रस्तानच्या समस्यांकडे नगरपरिषद नियोजन सभापती सय्यद नफीज यांनी वेधले लक्ष; पाणी आणि संरक्षण भिंतीसाठी प्रशासनाला साकडे...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

येथील छोटा कब्रस्तानमध्ये भेडसावणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेबाबत समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा नियोजन सभापती सै. नफिज सै. शफिक यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव जामोद यांना सविस्तर असे निवेदन दिले आहे.​ग्रामपंचायत धानोरा अंतर्गत असलेल्या या 'छोटा कब्रस्तान' स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी सोय नसल्याने येथे तात्काळ बोअरवेल खोदून देण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच, कब्रस्तानला सध्या कोणतीही कंपाउंड वॉल (संरक्षण भिंत) नाही. यामुळे या जागेची सीमा निश्चित करण्यात अडचण येत असून, परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी सिमेंटची संरक्षक भिंत बांधून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.​​नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्मशानभूमीचा परिसर सुस्थितीत करण्यासाठी या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी विनंती दिनांक २७ एप्रिल रोजी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नियोजन सभापती न.पजळगांव जामोद सै. नफिज सै. शफिक यांनी गटविकास अधिकारी संदीप मोरे यांना केली आहे. या निवेदनामुळे आता प्रशासन या कामासाठी कधी निधी उपलब्ध करून देते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post