जळगाव जामोद(प्रतिनिधी):
ही प्रकरणे कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे किंवा विविध विभागांमधील समन्वयाअभावी रखडता कामा नये असे सांगत . यावर उपाय म्हणून सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करत नागरिकांना लाभ देण्याचे निर्देश आमदार डॉ कुटे यांनी दिले.अतिक्रमण नियमितीकरणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे—जसे की मालकीचे पुरावे, वीज/पाणी बिल, मालमत्ता कर पावत्या, नकाशे आणि ओळखपत्र—यांची यादी स्पष्ट करून नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आमदार डॉ कुटे यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख असावी. कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा अनावश्यक अडथळे सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन आ कुटे यांनी केले.या आढावा बैठकीमुळे जळगाव जामोद मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरण प्रक्रियेला गती मिळणार आहे.

