छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करा; जळगाव जामोद काँग्रेस आक्रमक..
जळगांव जामोद (प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व चुकीचा इतिहास सांगून बदनामी करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्र बंदी करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज जळगाव जामोद काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच धीरेंद्र शास्त्री यांनी ज्यावेळी महाराजांविषयी अपमान जनक वक्तव्य केलं त्यावेळी तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दत्ता गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत हे हजर असताना पण त्यांनी त्याविषयी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कोणतीही टीका टिपणी न करता एक प्रकारे त्यांच्या वक्तव्याला दुजारा देण्याचे जे काम केले त्यामुळे त्यांचा पण निषेध करण्यात आला. यावेळी स्वातीताई वाकेकर,प्रकाश पाटील, एड. अमर पाचपोर, एड. भाऊराव भालेराव, अविनाश उमरकर, शेख नासिर शेख रोशन, एड. संदीप मानकर, डॉ. शाकीर खान, अर्जुन घोलप, वैशालीताई तायडे, संगीताताई भारसाकडे, दिनेश काटकर, जुनेद शेख, तुकाराम गटमने, जुबेर पटेल, प्रमोद पाटील, अब्दुल राजीक, सय्यद अफरोज व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
