जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव जामोद विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. (म.र.न ६०६) च्या वतीने बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून रामसेठ दगडूशेठ सिंधिकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.संस्थेची मासिक सभा दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी पार पडली. या सभेत जिल्हा बँकेत संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रामसेठ सिंधिकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याला सर्वच संचालकांनी एकमताने मंजुरी दिली.
--अनुभवी नेतृत्वावर सोपवली जबाबदारी--
रामसेठ सिंधिकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काचा आणि अनुभवाचा फायदा सहकारी संस्थेला व्हावा, या उद्देशाने त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या प्रतिनिधीत्वाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या निवडीनंतर जळगाव जामोद सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सभासद आणि शेतकरी वर्गाकडून त्यांचे मनापासून स्वागत केले जात आहे. 'एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व जिल्हा बँकेत संस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी मिळाले आहे,' अशा भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
