जळगांव जामोद(प्रतिनिधी):
दिनांक 27एप्रिल 2026रोजी स्थानिक तहसिल चौकातील बहुजन प्रतिपालक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवणावर आधारित कॉमरेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडि जळगांव जामोद च्या वतीने वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तथा तालुका अध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक वाचन करण्यात आले, बुलढाणा मतदार संघाचे आमदार यांनी पुस्तकाचे प्रकाशक यांना केलेल्या अश्लील शिविगाळ व जिवे मारण्याचा धमकिचा जाहिर निषेध करण्यात आला,राजा शिवछत्रपती धर्म रक्षक नसुन स्वराज्य रक्षक होते, बहुजन प्रतिपालक पालक,कुलवाडि भुषण, शिवाजी महाराज हे धर्म विरोधी नसुन स्वराज्य रक्षक होते हा खरा इतिहास लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988साली या पुस्तकात मांडला परंतु राजकारणी लोक आप आपल्या सोयीनुसार महाराजांच्या नावाचा गैरवापर करून सत्ता हस्तगत करत आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात या पुस्तकाचे वाचन करणार आहे,वाचन कार्यक्रम झाल्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करुन संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष देवानंद दामोधर, तालुका महासचिव सुनिलभाऊ बोदडे,माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर , तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे, तालुका उपाध्यक्ष साहेबराव जाधव,सुदाम गवई, श्रीराम भिडे,अक्षय वाकोडे, ज्ञानेश्वर तायडे, भिमराव हेलोडे,विजय पारवे, यशवंत भगत, रामभाऊ तायडे, संतोष तिजारे,सतिश तायडे गोपाल सोनोने,रोशन मदनकार, रमेश तायडे, राहुल वाघ, तुकाराम गटमने, सुरेश वाघोदे, भास्कर जुमळे, पिंटु पारवे,सुरेश शिरसाट, नारायण पारवे, राहुल वानखडे, आकाश कराळे सह वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
