सहकार कनिष्ठ महाविद्यालयाच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम...कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण..


 सहकार कनिष्ठ महाविद्यालयाच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम...कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण..

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी मंडळ परीक्षेचा निकाल दोन मे रोजी ऑनलाइन जाहीर झाला आहे... यामध्ये जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे... कनिष्ठ महाविद्यालयामधून इंग्रजी वाणिज्य शाखेसाठी 24, विज्ञान शाखा 15, कला शाखा 35 आणि वाणिज्य मराठी शाखेसाठी 49 असे एकूण 123 विद्यार्थी इयत्ता बारावीच्या मंडळ परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.. त्यापैकी इंग्रजी माध्यम वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा 65.66 आणि वाणिज्य मराठी 89.58% याप्रमाणे शाखा निहाय निकाल लागला आहे.. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेतून भाविक संतोष फलन 80.50%,तर वाणिज्य मराठी शाखेतून कु.पूजा अनंता वसुले 80.50 ,कला शाखेमधून कु.प्रणाली अरुण ठाकरे 74.33% आणि विज्ञान शाखेतून कुमारी वैष्णवी सुरेश वानखडे 63.53%, याप्रमाणे गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.. सदर मंडळ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला, मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, प्रकाश भुते, विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे , मनीषा म्हसाळ, प्राध्यापक राजेश आठवले, अमोल वानखडे, आकाश निलजे, गीता पलन, अमित धूत, मधुरीना चोपडे, सुचिता अस्वार,  यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..

Previous Post Next Post