जळगांव जा.विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे BLA-1 BLA-2 संदर्भात प्रशिक्षण शिबीर संपन्न...


 जळगांव जा.विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे BLA-1 BLA-2 संदर्भात प्रशिक्षण शिबीर संपन्न...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर शहरातील शिव प्लाझा सभागृह येथे जळगांव जा.विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे BLA-1 BLA-2 संदर्भात प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून संवाद साधला व मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण शिबीरास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार,शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वक संजय अगलदरे, शिवसेना पश्चिम विदर्भ सचिव वैभव थोरात, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे शिवसेना जिला प्रमुख संतोष डीवरे, महीला आघाडी जिल्हा प्रमुख शारदा ताई खानझोडे पाटील,युवा सेना जी प्रमुख ऋषि जाधव, युवा सेना लोकसभा अध्यक्ष ( घाटाखलील) चेतन घिवे, खामगाव विधानसभा BLA प्रमुख अमोल अंधारे,उपजिल्हा प्रमुख राहुल मारोडे, उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, यांची प्रमुख उपस्थिति होती तसेच जळगांव जा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी तसेच शाखा प्रमुख, बुथ प्रमुख मोठ्या संख्यने उपस्थित होते..SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या शिवसेना BLA नेमणूक अभियान संदर्भात जळगाव जा विधानसभा  मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत बूथ निहाय शिवसेना BLA नेमणुकीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रत्येक बूथवर BLA नेमणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे आज जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळत आहे.लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी शिवसैनिकाची ओळख आहे.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन,तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत BLA नेमणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पुढील कार्याची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या वेळी एकलारा ग्राम पंचायत सदस्य सुनील अस्वार,सोनाळा ग्राम पंचायत चे माजी सरपंच राजेश विश्वकर्मा,सोनाळा येथील मुस्लिम समाजाचे नेते शेख कौसर भाई,शेख अबुजर, कृष्णा उंडे, पिंटू भोलनकर,ज्ञानेश्वर गवळी, गोविंदा मेहनकार, कु.स्वाती ताई बामणे,यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेत केला. सर्व प्रवेश कर्त्यांचे शिवसेनेचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन  शिवसेनेत स्वागत करण्यात आले.यावेळी जळगांव जा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी,कार्यकर्ते हजारो च्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post