बी एस पटेल महाविद्यालयामध्ये ऍड सलीम पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण...
जळगाव जामोद(प्रतिनिधी):
बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड सलीम पटेल साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.एक मे रोजी आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. सोबतच एक मे हा कामगार दिन असून या दिवशी कामगारांची जाचक अटी मधून मुक्तता झाली. बी एस पटेल शैक्षणिक संकुलतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे याची शिक्षकांनी दखल घ्यावी. असे सांगून महाराष्ट्र दिन व बुध्दापौर्णिमा निमित्त बी एस पटेल शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ. शत्रुग्न जाधव संचालक सिराजोद्दीन पटेल या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक दरबार सिंग जाधव दिवाणसिंग वतपाळ उपसरपंच निलेश भाऊ भोपळे हज्जन जैतूनबी बापुमिया पटेल डे कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोयब हायस्कुलचे मुख्याध्यपाक अजित तडवी प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ बाबराव सांगळे व आभार प्रदर्शन प्रदीप गायकवाड यांनी केले.
