बी एस पटेल महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावर उष्माघात मदत कक्ष स्थापन...


बी एस पटेल महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावर उष्माघात मदत कक्ष स्थापन...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे विद्यापीठाच्या पत्रानुसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲड सलीमजी पटेल उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख संचालक सिराजोद्दीन पटेल व महाविद्यालयाचे प्राचार्य शत्रुघ्न जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्रावरील उष्माघात मदत केंद्राची स्थापना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. महाविद्यालयाच्या एका सुसज्ज हॉलमध्ये कुलर लावून कुलयुक्त वातावरण तयार करण्यात आले. ऊन असल्यामुळे खूप विद्यार्थी परीक्षेच्या अगोदर किमान एक ते तास दोन तास आधी येतात. अशा मुलांना उष्णतेपासून संरक्षण व काही वेळ शांततेत अभ्यास करता यावा व परीक्षा सुरू असताना काही मुले उष्णतेमुळे अस्वस्थ होतात त्यांच्यासाठी  महाविद्यालयाने अशा थंडगार आरामदायक हॉलची व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांची सुद्धा या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी या हॉलमध्ये थंड पाणी व उष्मघाताचे प्राथमिक साहित्य ग्लुकोज ओआरएस इत्यादी ठेवण्यात आलेले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना तात्काळ मदत करता येईल. या उष्माघात कक्षाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, शत्रुघ्न जाधव यांनी केले. या उष्माघात कक्षाचे समन्वयक  डॉ बाबाराव सांगळे यांनी संपूर्ण नियोजन व कार्यक्रमाचे संचालन केले तर या उष्माघात केंद्राच्या यशस्वीतेसाठी डॉ नूर मोहम्मद डॉ शेख फराह डॉ महेश नेतनस्कर डॉ चेतन पलन डॉ निखिल अग्रवाल डॉ प्राजक्ता बाठे डॉ आनंद जाधव आशिष इंगळे व अक्षय तायडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post