हिवरखेड तेल्हारा मागें अकोला बस सुरू करा,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची मागणी...


 हिवरखेड तेल्हारा मागें अकोला बस सुरू करा.अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची मागणी...

तेल्हारा तालुका (प्रतिनिधी):

हिवरखेड तेल्हारा अकोला मार्गे बस सुरू करण्याची मागणी दिनांक २मे रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा हिवरखेडच्या वतीने तेल्हारा बस आगार व्यवस्थापन यांना करण्यात आली, आगर व्यवस्थापक मी, रा, शर्मा यांना हे निवेदन देण्यात आले, हिवरखेड अकोट मार्गांचे काम सुरू असल्याने हिवरखेड अकोट मार्गे अकोला जाण्यास विलंब होतो, प्रवाशी विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्काळ ही बस सकाळ दरम्यान तापमानाचा वेग पाहून सुरु करण्यात यावी, ही मागणी पत्रकार संघाचे वरिष्ठ मनोहर सुने, कैलासबापू देशमुख, युसूफखान यांच्या मार्गदर्शनाखाली नाना इंगोले, धीरज बजाज, नंदकिशोर नागपुरे, राजपाल दामोदर, देवकीनंदन माथेरिया विजय घोडे, अर्जुन खिरोडकार, यांच्या स्वाक्षरीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यानंच्या वतीने करण्यात आली,

Previous Post Next Post