जळगाव जामोद(प्रतिनिधी):
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर, राज्य पेटांक्यु असोसिएशन फॉर महाराष्ट्र व अहिल्यानगर पेटांक्यु असोसिएशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय पेटांक्यु शालेय राज्य क्रीडा स्पर्धाचे 21 ते 23 मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.... अवतार मेहरंग बाबा ट्रस्ट, दौंड रोड, अहिल्यानगर येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 8 विभागाचे संघ सहभागी झाले होते.. सदर स्पर्धा मिक्स डबल, डबल सिंगल ट्रिपल शूटिंग या प्रकारात घेण्यात आल्या.. या स्पर्धेमध्ये जळगाव तालुक्यातील जनता विद्यालय जामोदच्या संघाने ट्रिपल प्रकारामध्ये कु. श्रुती राऊत, कु.लक्ष्मी डोबे व कु.मनस्वी राऊत यांना गोल्ड मेडल, डबल प्रकारामध्ये कु. गायत्री दामधर, कु. ऋतुजा चिकटे व कु आरती निखाडे यांना ब्रांझ मेडल तसेच सिंगल प्रकारात ब्राऊन मेडल जिंकून घवघवीत यश संपादन केले. अहिल्यानगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे, मेहरंग बाबा ट्रस्टचे कलचौरी, पेट्यांक्यू संघटनेचे सचिव प्रदीप साखरे, अहिल्यानगर असोसिएशनचे सचिव मकरंद कोरडकर आणि जळगाव जामोद तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येउल यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाल्या.सर्व विद्यार्थिनींचे तसेच त्यांना प्रोत्साहन देणारे मुख्याध्यापक श्री आर.बी. राजपूत सर व पर्यवेक्षक श्री अभिजीत कुलकर्णी सर, मार्गदर्शक श्री प्रतीक राऊत सर राष्ट्रीय खेळाडु, क्रीडा शिक्षक जनता विद्यालय जामोद व अंकिता पारवे मॅडम सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...
