जळगाव जामोद(प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा बुलढाणा व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने “कृषी तंत्रज्ञानाचा जागर – खरीप हंगाम मोहीम 2026” अंतर्गत खरीप हंगाम नियोजन तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी मा . आमदार महोदय जळगाव जामोद यांच्या मार्गदर्शनामध्ये योगा हॉल, नगर परिषद जळगाव जामोद येथे करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सौ. अपर्णाताई कुटे या उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. बाळासाहेब व्यवहारे (उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव), हे होते. तसेच कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य. माननीय श्री विकास जाधव (मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद) यांचे लाभले.कार्यक्रमात खरीप हंगाम पूर्व नियोजन, अलनिनोच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, मृदा परीक्षण, तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी, नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मा. संजय उबाळे सर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले.तसेच तालुका कृषी अधिकारी श्री रमेश जाधव यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावयाचे बदल याबद्दल तसेच महाविस्तार कृषी AI अँप चे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. व महाविस्तार सर्व शेतकऱ्यांनी डाऊनलोड करून घ्यावे याचे कळकळीचे आव्हान केले.कार्यक्रमास तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री के.व्ही.भगत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व मंडळ कृषी अधिकारी उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
