जळगाव जामोद (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा नुकताच निकाल लागला असून पिंपळगाव काळे येथील हज्जन जैतुनबी बापुमिया पटेल कनिष्ठ महाविद्यालयाने सलग तिसऱ्यां वर्षीसुद्धा उत्कृष्ट निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेतून 82 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 81 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे विज्ञान शाखेचा निकाल 98.78% लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक सै. आतिर सै. ज़फ़र ह्याने पटकाविला असून त्याला 88.67% गुण प्राप्त झाले आहे, तर द्वितीय क्रमांक वैष्णवी सुधाकर घटे ह्याचा असून तिला 88.33% गुण प्राप्त झाले आहेत, तसेच विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांक आदित्य शिवहरि गई याने पटकाविला असून त्याला 84.33% गुण मिळाले आहेत.तसेच कला शाखेतून 27 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीमध्ये 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 88.88% लागला आहे . कला शाखेतून प्रथम क्रमांक रुकय्या परवीन या विद्यार्थिनीने 66.67% गुण प्राप्त केले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला आहे. .एकुण महाविद्यालयाचा 96.36% निकाल लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष ॲड. सलीमजी बापूमिया पटेल, उपाध्यक्ष कय्युम पटेल सर, सहसचिव रब्बानीजी देशमुख, तसेच संचालक सिराजोद्दीन भाई पटेल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मो. शोएब सर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील उज्जवल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
