कोल्हटकर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम...


 कोल्हटकर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील कला व वाणिज्य या दोन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी करत उज्ज्वल निकाल नोंदविला आहे.यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल 91.66 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 79.26 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत एकूण 72 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 66 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेत 82 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 65 विद्यार्थी यशस्वी ठरले.दोन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढविला. वाणिज्य शाखेत कोमल श्रीकृष्ण नळकांडे हिने प्रथम क्रमांक मिळविला, नम्रता प्रल्हाद कराळे हिने द्वितीय, तर स्नेहा गोपाल गिऱ्हे व कल्याणी गोपाल वानखडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कला शाखेत सरला देविदास वाघ हिने प्रथम, वैष्णवी शिवशंकर रोहनकार हिने द्वितीय, तर दिव्या गणेश अहिर हिने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी तसेच संचालक ऍड. शशिकांत गुप्ता, अभिजीत कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी आणि गायत्री विप्रदास यांनी प्राचार्य डॉ. गिरीश मायी, अधीक्षक संजय गाडेकर यांच्यासह पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखेडे, प्रा. राजीव देवकर, प्रा. ऋषिकेश कांडलकर, प्रा. गणेश जोशी, प्रा. विनोद बावस्कर, प्रा. रामेश्वर सायखेडे आणि प्रा. नीलिमा भोपळे यांचे अभिनंदन केले.महाविद्यालयाच्या या यशस्वी निकालामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Previous Post Next Post