राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावाच्या ठिकाणी दिनांक २५/५/२०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना अंतर्गत उपकेंद्र बोराळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या आदिवासी व दुर्गम भागातील परिसरात बोराळा उपकेंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदान करण्यासाठी आजुबाजूच्या नागरिकांनी आप आपली हजेरी लावली असल्याचे चित्र दिसून आले आहे.या रक्तदान शिबिराचे नियोजन व आयोजन म्हणून डॉ. विशाल दाभाडे (देशमुख) व डॉ. अंजली लहाने यांचा मोलाचा वाठा राहीला आहे. तसेच डॉ अंजली लाहाणे CHO , उर्मिलाताई, रेखाताई आशा स्वयंसेविकांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत काळे (विधानसभा संयोजक, मेळघाट युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी), सुखदेवराव पवार (माजी जिल्हा परिषद सदस्य), सांगरभाऊ जाबेकर (पोलीस पाटील), डॉ. केशव कंकाळ (वैद्यकीय अधिकारी), गजानन सुने आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा अशोक सुरतने (आरोग्य सहाय्यक), श्रीमती सुरतने BF, तसेच बोराळा उपकेंद्रातील सर्व आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका मोना नाईक तसेच ADHO कार्यालयातील संगम सावळे हे उपस्थित होते.या उपक्रमाबाबत मा. डॉ. प्रविण पारीसे (जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती) व डॉ. महेंद्र नाडे (तालुका आरोग्य अधिकारी, चिखलदरा) यांनी समाधान व्यक्त करत, “मेलघाट कार्यक्षेत्रात उपकेंद्र स्तरावर यशस्वी रक्तदान शिबिराचे आयोजन ही अभिमानास्पद बाब असून अशा उपक्रमातून इतर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांनाही प्रेरणा मिळेल,” असे मत व्यक्त केले.समाजहितासाठी आयोजित या रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून उपस्थित सर्व मान्यवर, रक्तदाते व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्व अभिनंदन करण्यात आले आहे.
