जळगाव जामोद(प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये बापूमिया सिराजोद्दीन पटेल विद्यालय पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा येथील दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे यामध्ये प्रथम क्रमांक कु.रोशनी राजेंद्र वरखेडे 76.40 द्वितीय क्रमांक प्रेम संतोष मुंडाले 75.40 तृतीय क्रमांक कु. वर्धिनी दिलीप भोंडोकार 73.80 असे एकूण 52 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी विशेष प्राविण्य 02 प्रथम श्रेणी 15 द्वितीय श्रेणी 27 असे एकूण 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 84.61% एवढा लागला आहे. विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम बापूमिया पटेल साहेब, उपाध्यक्ष कय्युम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, संचालक सिराजोद्दीन भाई पटेल मुख्याध्यापक अजित गुलाब तडवी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद इंगळे सर, हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शोएब सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
