नांद्राकोळी येथे बुद्धविहार लोकार्पण व तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना..!


 नांद्राकोळी येथे बुद्धविहार लोकार्पण व तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना..! 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी;

बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्धविहाराचे लोकार्पण तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचेहस्ते बुद्धविहाराचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विधिवत पूजा, बौद्ध वंदना आणि धार्मिक विधींनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचीप्रतिष्ठापना संपन्न झाली. यावेळी उपस्थित बुद्ध उपासक-उपासिका आणि समाजबांधवांसमवेत शांतता, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.याप्रसंगी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या महान विचारांचा गौरव करत सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार करण्याचे आवाहन केले तसेच बुद्धविहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाला प्रेरणा देणारे ज्ञान, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, सरपंच संजय काळवाघे, गजानन घुबे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील बुद्ध उपासक-उपासिका आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नांद्राकोळी येथील हा लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या बुद्धविहाराच्या माध्यमातून गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post Next Post