जळगाव जामोद(प्रतिनिधी):
31 मे व १ जुन ला संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्या मुळे जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात केळी व संत्रा बागा चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री प्रकाशभाऊ पाटील यांनी 2 जून ला सकाळी 10 वाजे पासून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या व नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. जामोद येथील अल्पभूधारक शेतकरी रामाभाऊ राऊत यांच्या शेतात गेले असता सदर शेतकरी अक्षरशः रडायला लागले व हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने आता जगणे कठीण झाले असल्याचे सांगीतले.जामोद येथील अमोल हिस्सल व पंकज हिस्सल यांच्या नर्सरी चे पॉलिहाऊस व शेडनेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी प्रकाश पाटील यांनी कर्मोडा, शेतखेड, जामोद, उसरा, चालथाना, सुनगाव, जळगांव इत्यादी गावातील शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांचे सांत्वन केले तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याची ग्वाही दिली.यावेळी प्रकाश पाटील यांच्या सोबत कैलास बोडखे, आसिफ इक्बाल, समाधान दामधर, स्वप्नील देशमुख,सुभाष ढगे, अमोल भगत, देविदास केदार, सागर बोडखे, उकर्डा सोळंके, सबधर खान, रमेश धुर्डे, गोविंदा दामधर, जुनेद शेख,अजय ताठे, बंटी कळसकर, अमोल हिस्सल, पंकज हिस्सल, रामा राऊत सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
