हिवरखेड सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम राजनकार, उपाध्यक्षपदी रामदास गावंडे; थाटात पार पडला पदग्रहण सोहळा....


 हिवरखेड सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम राजनकार, उपाध्यक्षपदी रामदास गावंडे; थाटात पार पडला पदग्रहण सोहळा....

प्रशांत भोपळे/हिवरखेड(प्रतिनिधी);

हिवरखेड येथील सेवा सहकारी सोसायटी संस्था मर्यादित (र.नं. ९०१) च्या नूतन अध्यक्षपदी पुरुषोत्तम राजनकार आणि उपाध्यक्षपदी रामदास पाटील गावंडे यांची निवड झाल्यानिमित्त, संस्थेच्या प्रांगणात त्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. प्रशांत इंगळे यांनी भूषवले. पदग्रहण सोहळ्याप्रसंगी रमेश दुतोंडे, राजेंद्र भोपळे, मधुकर पोके, अनिल भोपळे, डॉ. राम तिडके, महेंद्र भोपळे, मनिष भुडके, मिलिंद भोपळे, संदीप इंगळे, शांताराम कवळकार, अजीज भाई, वैभव गावंडे, किरण सेदाणी, दिपक रायबोले, गणेश वानखडे, रवींद्र मानकर, रवी वाकोडे, महादेव गावंडे, ज्ञानदेव मोरोकार, केशव देशमुख, सत्यदेव काईंगे, राधेशाम राठी, मोहम्मद शफाकत, विनोद भोपळे, राजिकभाई गोर्धा, पांडुरंग येऊल, राजू उद्दीन बहोद्दिन, बाबुराव वाकोडे, सतीश इंगळे, संजय राजनकर, मोईज भाई जामदार, संजय राऊत, नाजीम खा, सुधाकर गावंडे, दशरथ गावंडे, केशव गावंडे, अन्सार भाई बहोद्दीन, सिद्धधन इंगळे आणि गोपाल गावंडे यांच्यासह शेतकरी प्रगती पॅनलचे सर्व नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश दुतोंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी केशव कोरडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post Next Post