जळगाव जामोद (प्रतिनिधी):
काँग्रेस पक्षातील तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या मान्यवरांनी आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रहित, विकासाभिमुख व जनकल्याणकारी ध्येय-धोरणांवर विश्वास व्यक्त करत विभागाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात त्यांच्या हस्ते भाजपा चा दुपट्टा टाकून आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रवेश कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक निलेश साबे, माजी संचालक प्रमोद तितरे, भेंडवळ येथील प्रतिष्ठित नागरिक मोहनराव सपकाळ तसेच मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव साबे यांचा समावेश होता.पक्षात प्रवेश करताना सर्व मान्यवरांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर व विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय व सामाजिक वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे.या सर्वांचे पक्षात स्वागत करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचा अनुभव,कार्यक्षमता आणि समाजातील व्यापक संपर्क याचा निश्चितच पक्ष संघटन मजबूत करण्यास व जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस मोठा फायदा होणार आहे.दरम्यान, या प्रवेशामुळे आगामी काळात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.यावेळी गजानन सरोदे, प्रवीण भोपळे,बंडू पाटील, संजय पांडव, अमित भिवटे, निलेश खाळपे, परीक्षित ठाकरे,मनोहर खाळपे,गजानन सुशीर,विठ्ठल वाघ,संजय बोरसे,श्रीकृष्ण बोळे,अनंता गावंडे, संतोष वसतकार,संतोष चिकटे,विजू काळदाते,विठ्ठल सुशीर,वहीत्कार यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________________
सबका साथ सबका विकास या प्रमाणे कार्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या राजनीतिक जीवनात करीत असतात याचा चा हा प्रभाव आहे की अनेक पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाशी जुडण्याचा मानस व्यक्त करतात. त्याचाच हा एक भाग आहे ही केवळ चार व्यक्ती नसून यांचा जनाधार आहे त्यामुळे या चौघानसह व त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत आहे. आ डॉ संजय कुटे
