जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प दृढ केला तसेच पर्यावरणाचे रक्षण हीच खरी मानवसेवा असल्याचा संदेश दिला.याप्रसंगी उपस्थितांनी सांगितले की, वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून मानवजातीच्या अस्तित्वाचा आधार आहेत. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.पंतप्रधान Narendra Modi यांच्या "एक पेड माँ के नाम" या प्रेरणादायी अभियानातून प्रेरणा घेत अधिकाधिक वृक्षारोपण करून हरित, स्वच्छ आणि सुंदर भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. "आज लावलेले एक झाड उद्याचे सुरक्षित जीवन घडवते" हा संदेशही यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, नगराध्यक्ष गणेश दांडगे, शहराध्यक्ष अजय वंडाळे, उपनगराध्यक्ष कैलास पाटील, सुनील रघुवंशी, राजू हिस्सल, परमसिंह राजपूत, शाकीर खान, सचिन जोशी, राजेश गोटेचा, डॉ. नंदू तायडे, अनिल जैस्वाल, मनोज राठी, भगतसिंग चव्हाण, उमेश येऊल, संजय चोपडे, अजिंक्य नरसेकर, सुरेश इंगळे, महेंद्र नितवणे, वैभव अंबडकर, विनायक भगत, राजू कपले, कैलास सोनवणे, निलेश धुरडे, मंगेश बावस्कर, शुभम चंडाले, अनिल अंबडकार, करणसिंग राजपूत, अक्षय देशमुख, प्रणव ठाकरे, शरद खवणे, संतोष वेरुळकर, सखाराम ताडे, राजकुमार गायकी, श्रीराम सिंधीकर, शंकर धुरडे, अहमद खान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
