अकोटात मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर,शेतकरी सन्मान सोहळा...


अकोटात मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर,शेतकरी सन्मान सोहळा...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोट येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर सिल्वर फाउंडेशन आकोट यांचे वतीने तालुक्यातील २१ आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी  जिल्हा परिषद सभापती   बाळासाहेब बोंद्रे हे होते.तर मंचावर त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती धीरज हिंगणकर,सिल्वर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर पांडे,प्रसिद्ध वराडी कवी विठ्ठल कुलट,माजी जि प सदस्य गोपाल कोल्हे,सचिव रवींद्र कापसे,प्रकल्प प्रमुख प्रभाकर नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रकाश गायकी यांनी केले.याप्रसंगी संतोष सपकाळ सावरा,जगन्नाथ धर्मे बोर्डी,डॉ नवेश मोहता वरुड जऊळका,शिवशंकर कोकाटे करतवाडी,घनश्याम बिजने अकोलखेड,दत्तात्रय ओळंबे खापरवाडी,प्रशांत मानकर उमरा,शंकर लोखंडे चंडिकापूर,संजय पांडे धनकवाडी,बालाजी आंधळे केलपाणी,स्वप्निल रावणकार पिंपरी,कार्तिक झामरे रोहनखेड,मोहन नवले,उमेश शेटे वरुड जऊळका,शुभम महल्ले शिवपूर,योगेश येऊल दानापूर,वैभव सपकाळ सावरा,शुभम महल्ले शिवपुर,नितीन बोरुडे मुंडगाव,सुरज नाथे नंदीपेठ,गोपाल येऊल दानापूर यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला सिल्वर फाउंडेशन सदस्य डॉ.अविनाश भिसे,प्रा.संजय वालसिंगे,सुबोध कराळे,पंकज गिरी,अनिल कोरडे,अशोक लोणकर, गजेंद्र अतकर,राजेंद्र रंदी,राजकुमार भगत,मनोहर घायल,चंद्रशेखर राऊत,गणेश ढोले,गोपाल रावणकर,पंकज गिरी,बाबाराव झांमरे,ज्ञानेश्वर सांगळे,वासुदेव भास्कर,अनिल हिंगणकर,अरुण खापरकर,गोपाल कावरे,गोपाल वानखडे,राजू मोडोकार,नंदकिशोर साबळे,अतुल मंगळे,मोहन वानखडे,राजू कुटाफळे,संजय शेगोकार,यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post Next Post