कर्जमाफीच्या जाचक अटींविरुद्ध रोहित पवार यांच्या 'अन्नत्याग' आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातून जाहीर पाठिंबा; जळगाव जामोद येथे प्रशासनाला निवेदन...


 कर्जमाफीच्या जाचक अटींविरुद्ध रोहित पवार यांच्या 'अन्नत्याग' आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातून जाहीर पाठिंबा; जळगाव जामोद येथे प्रशासनाला निवेदन...

जळगाव जामोद/बुलढाणा:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' म्हणजे प्रत्यक्षात कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा व कर्जवसुलीची नवी शक्कल आहे. या योजनेतील जाचक अटींमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या अन्यायकारक अटी तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलढाणा यांना मा. उपविभागीय अधिकारी (एसडीओ), जळगाव जामोद यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.तसेच, शेतकऱ्यांच्या याच न्याय्य हक्कांसाठी आणि कर्जमाफीच्या जाचक अटीं रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी चे नेते मा. रोहित दादा पवार यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला व संघर्षाला बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या वतीने अधिकृत व जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

      आमच्या मागण्यांबाबत शासनाला त्वरित अवगत करावे आणि शेतकऱ्यांचा हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आणि मा.आ.रोहितदादा पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाची सरकार ने दखल न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई वाघ, अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष ॲड. करीम खान,विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कार्याध्यक्ष महादेव भालतडक, संचालक मनोहर पाटील, दत्ता डिवरे,नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे , संदीप वाघ, गजानन भालतडक , खरेदी विक्री संघांचे संचालक अनंत वाघ, दिनेश वाघ, सुहास वाघ, शिवा उगले , पंजाब वाघ, श्रीकृष्ण तुकाराम जाधव, सरपंच गजानन रघुनाथ रोठे, यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post