बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:
सरकारची कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळालीच पाहिजे!या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे शेगाव येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातुन शेगाव तालुका येथे अधिकृत पाठिंबा घोषित करण्यात आला.तालुकाध्यक्ष संजय पहुरकर,संगीतराव भोंगळ प्रदेश ऊपाधयक्ष. पांडुरंग दादा पाटील सहकार नेते.देवलालभाऊ पाटील जिल्हा उपाध्यक्ष,नंदाताई पाऊलझगडे महीला अमरावती विभागीय अध्यक्ष. विजय कराळे कार्याध्यक्ष, प्रभाकर खंडारे तालुकाध्यक्ष सा.न्याय विभाग.सुधिर इंगळे. सुधाकर ढोले. वषा॔ताई सावदेकर. विष्णु पहुरकर, अशोकराव शेळके . सतिष खोंड. अंकुश ऊन्हात संतोष भिलंगे सुपडा गावंडे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते निवेदन देते वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
