जळगाव जामोद (प्रतिनिधी):
केंद्रातील मोदी सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना, विकासकामे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला "विकसित भारत – मोदी सरकारच्या उपलब्धींची प्रदर्शनी" हा कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजूभाऊ गांधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या विविध लोकहितकारी योजनांची माहिती दिली. तसेच पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी गजानन सरोदे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपनगराध्यक्ष कैलास पाटील, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजय वंडाळे, बाळू चव्हाण, डॉ. नंदकिशोर तायडे, राजेश गोटेचा, पांडुरंग मिसाळ, राजू हिस्सल, सुनील रघुवंशी, सचिन जोशी, परमसिंह राजपूत, उमेश येऊल, संतोष डोबे, वैभव अंबडकर, शाकीर खान, अरुण खिरोडकर, सुरेश इंगळे, राम इंगळे, करणसिंग राजपूत, अजिंक्य नरसेकर, राजूभाऊ कपले, गोटू खत्ती, धनंजय देशमुख, योगेश धर्मे, राजकुमार गायकी, संतोष वेरुळकर, गौरव गावंडे, प्रवीण भोपळे, निलेश धुर्डे, वैभव जाधव, अनिल ढगे, शंकर धुर्डे, प्रणव ठाकरे आणि राजू ताडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रदर्शनीमध्ये मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती फलक, छायाचित्रे आणि माहितीपत्रकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांविषयी जाणून घेतले. उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे शासनाच्या विकासात्मक कार्याची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.नागरिकांमध्ये राष्ट्रविकासाविषयी सकारात्मक विचार निर्माण करून "विकसित भारत" या संकल्पनेला अधिक बळकटी देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
