सहकार विद्या मंदिरात शिक्षकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न...


 सहकार विद्या मंदिरात शिक्षकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

दि. 16 जून 2026 रोजी सरोजदेवी किसनलाल केला सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथे शिक्षकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बुलढाणा येथील सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते तुषार डोडिया यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवण्यासाठी विविध कृतीयुक्त अध्यापन पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नाविन्यपूर्ण तंत्रे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अशा विविध विषयांवर डोडिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृती यांचा समन्वय साधत अध्यापन अधिक प्रभावी कसे करता येईल, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विविध प्रकारच्या शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून अध्यापन अधिक रंजक, सुलभ व परिणामकारक कसे बनवता येईल याचे प्रात्यक्षिकही सादर केले.या निमित्ताने प्रमुख व्याख्याते तुषार डोडिया यांचा शाल व पुष्पहार देऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ.किशोर केला सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय माहेश्वरी महासभेत निवड झाल्याबद्दल डॉ. किशोर केला सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक विनायकजी उमाळे सर यांच्या हस्ते करण्यात आला. याचप्रमाणे शाळेच्या मुख्य संयोजिका आदरणीय डॉ. स्वाती केला यांचाही सत्कार शाळेच्या पर्यवेक्षिकांच्या हस्ते करण्यात आला. डोडिया यांच्या उत्स्फूर्त व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षकांना नवीन ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन आणि अध्यापनातील नाविन्यपूर्ण कल्पना प्राप्त झाल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विनायक उमाळे सर, राजेश लोहिया सर तसेच विनोद ईश्वरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन दवे मॅडम यांनी केले, तर तुषार डोडिया यांचा परिचय साकेत गिरजापूरे सर यांनी करून दिला.कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वांनी या मार्गदर्शनाचा मनःपूर्वक लाभ घेतला.

Previous Post Next Post