प्रशांत भोपळे/हिवरखेड....
हिवरखेड विचार मंच व समस्त नागरिकांच्या वतीने महावितरणच्या हिवरखेड कार्यालयात स्मार्ट मीटर योजना व नियमित वीजपुरवठ्याबाबत सहाय्यक अभियत्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात हिवरखेड परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखावी तसेच गाव व परिसरातील वीजपुरवठ्याच्या विविध समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित, अखंडित व पुरेशा दाबासह वीजपुरवठा देणे, वारंवार होणारी वीजखंडिती थांबविणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे, अशा विविध मागण्याही करण्यात आल्या.यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय मिसाळ व सहाय्यक अभियंता . धांडे यांनी नागरिकांशी संवाद साधत स्मार्ट मीटर संदर्भातील भावना जाणून घेतल्या. तसेच यापुढे शहरात स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे परिसरातील वीजग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे... या पुढे कुठल्या ग्राहकांचे सक्तीने स्मार्ट मिटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ त्याला विरोध करून स्मार्ट मिटर बसवण्यास मनाई करावी व तसे पत्र महावितरण ला देण्यात यावे असे आवाहन हिवरखेड विचार मंच च्या वतीने करण्यात आले आहे.
ग्राहकांना स्मार्ट मीटरचा काहीच उपयोग नाही, कालावधी होण्याआधीच मीटर बंद पडते.यांचा उपयोग फक्त हा कंपनीलाच आहे, आम्हाला नको हे स्मार्ट मीटर,
तुषार गावंडे
(हिवरखेड)
ग्राहकांनवर कुठल्याच प्रकाराची सक्ती केली जाणार नाही, विचारपूस करूनच मीटर लावण्यात येईल आणि या मीटरचे फायदे पण सांगू,
धनंजय मिसाळ
अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण
(अकोट)
