चादपुर येथिल नाल्यावर झालेल्या दोन गॅबिन बंधारे चे कामे अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने निकृष्ट दर्जाचे...


 चादपुर येथिल नाल्यावर झालेल्या दोन गॅबिन बंधारे चे कामे अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने निकृष्ट दर्जाचे...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यात होत असलेले गॅबिन बंधारे चे कामे अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने एकदम निकृष्ट दर्जाचे आपल्याला पाहायला मिळत आहे.प्राप्त माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील टेब्रुंसोडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये बहुतेक ठिकाणच्या जागी गॅबिन बंधारे चे कामे सुरू असून चादंपुर या गावाच्या बाजूने जाणारा नाला या नाल्यावर दोन गॅबिन बंधारे चे कामे म्हणजे विस लाखांचे कामे एका आठवड्यात कंत्राटदाराने कसे बसे पुर्ण केले आहे.बोलले जात आहे की ज्या शेत मालकाच्या च्या शेतीच्या बाजुने हे काम केले आहे.त्या शेतीच्या धुऱ्यावर दगडाचा बांध असुन कंत्राटदाराने खोदकाम केला नसुन त्या दगडाच्या बांधावरच बांधकाम केले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित शेत मालकाने केला आहे.होत असलेल्या निकृष्ट दर्जाचे कामाला येथिल शेतकऱ्यांने विरोध केला असता तर कंत्राटदार यांनी 'जैसा हमारे को साहेब ने काम करने को बोला वैसा हमने किया ' असे म्हणने कंत्राटदारांचे आहे.अशा वाक्यावरून समजले जाते की खरोखरच कंत्राटदारांच्या डोक्यावर चिखलदरा येथिल बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे हात आहे.असे स्पष्ट दिसत आहे.तसेच या कामावर झालेली दगडाची पिचिंगवर कसे बसे तार झाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे.तथापि अधिकाऱ्यांने या कामाची पाहणी करावी नंतर कंत्राटदारांचे बांधकामांचे बिल पास करावे.अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post Next Post