जळगाव जामोद(प्रतिनिधी):
स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऑड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल प्राचार्य डॉ शत्रुघ्न जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत महाविद्यालयामध्ये सकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवत प्रेक्षकांकडून करून घेतले व योगासनांचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एम बी इंगळे हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तडवी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा मनोहर जांभळे शारीरिक शिक्षक जितेंद्र कचवे व सिंधू राऊत तृप्ती भोपळे डॉ प्राजक्ता बाठे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
