राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पेसा मोबिलाईझर संघर्ष समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने आज, नाशिक जिल्ह्यातील, दिंडोरी तालुक्यातील वनारे या गावी मंत्री.नरहरी झिरवळ साहेब यांची भेट घेऊन त्यांना पेसा मोबिलाईजर यांच्या प्रश्नाविषयी निवेदन देण्यात आले व पेसा मोबिलाईजर यांची पदे कमी होऊ नये यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.पेसा मोबिलाईझर यांची पदे रद्द करू नका.या मागणीचे निवेदन किसान सभा व पेसा मोबिलाईझर संघर्ष समनव्य समितीने दि.12 जून रोजी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पुणे येथे भेटून दिले होते.यावेळी किसान सभेचे, राज्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी नरहरी झिरवळ यांचेशी फोनवर संवाद साधून या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती केली होती.त्यानुसार आज दि. 14 जून रोजी,पेसा मोबिलाईझर संघर्ष समन्वय समितीचे शिष्टमंडळ यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारे या गावी, मा.मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी,मंत्री महोदय यांचेसोबत पेसा मोबिलाईजर यांच्या
प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रश्नाविषयीं राज्याचे ग्रामविकास मंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या सोबत मिटिंग आयोजित करण्याचे आश्वासन दिले.पेसा मोबीलाईझर यांची पदे टीकावी यासाठी पूर्ण सहकार्य करणार असे ही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी, माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉ. सुनील मालुसरे,पेसा मोबीलाईझर संघर्ष समन्वय समितीचे डॉ. अमोल वाघमारे, कॉ. संगीता साळवे,झुलेखा घोडे,सत्यभामा धराडे,दया केंगले,लता केदारी,रुपाली करवंदे व नाशिक, धुळे, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील पेसा मोबीलाईझर मोठया संख्येने उपस्थित होते.
