जळगाव जामोद(प्रतिनिधी):
त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार येथे शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहाचा साजरा करण्यात आला. विद्यार्थी जीवनामध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाला अनन्य साधारण महत्व असते. भविष्याचे स्वप्न वआकाश कवेत घेण्याची क्षमता याच दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजत असते. या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व्हावे विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विद्या काटले मॅडम होत्या. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यां चे पुष्पगुच्छ व पेढे वाटून स्वागत करण्यात आले. नवी ऊर्जा नवी आकांक्षा घेऊन या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. शिस्त, संस्कार, सदाचार, वक्तशीरपणा, यासारख्या मूल्य शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
