जळगाव जामोद(प्रतिनिधी);
दिनांक १ जून च्या सायंकाळी जळगाव जामोद शहरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याकडील झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांचे काही प्रमाणात नुकसानही झाले.घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष गणेश दांडगे आणि नगर परिषद उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी स्वतः पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरू केले.त्यांच्या तत्परतेमुळे बंद झालेली वाहतूक लवकर सुरळीत करण्यात यश आले. तसेच संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन शहरातील इतर धोकादायक ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली.या आपत्कालीन परिस्थितीत नगराध्यक्ष गणेश दांडगे व उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचे व जनसेवेच्या भावनेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेल्या कार्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
